आमीर वचनाला पक्का

आमीर सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या अनेक चॅट शो पैकी सर्वाधिक टॉपचा अँकर ठरला असला तरी आमीर दिलेल्या वचनाला पक्का आहे. याचा अनुभव नुकताच आला. `सत्यमेव जयते’ या त्याच्या शोमध्ये घरगुती हिंसाचार विषयावरील जो कार्यक्रम झाला. त्यात सहभागी झालेल्या शानो या टॅक्सीचालक महिलेला त्याने वचन दिले होते. ते असे की जेव्हा कधी तो दिल्लीत येईल तेव्हा शानोच्याच टॅक्सीतून प्रवास करेल. विशेष म्हणजे आमीर नुकताच दिल्लीला गेला होता आणि त्याने आठवणीने शानोचीच टॅक्सी मागवून त्यातून प्रवास केला.

आमीरच्या `सत्यमेव जयते’ला अमिताभ बच्चन यांच्या `कौन बनेगा करोडपती’ या शोपेक्षा कमी टीआरपी मिळाला आहे. पण त्याबाबत आमीर मुळीच काळजी करत नाही. तो सांगतो माझ्या कार्यक्रमाचे खेडोपाडीही प्रेक्षक आहेत तसेच शहरातूनही आहेत यातच मला समाधान आहे. लोकांना कार्यक्रम आवडतो हेच मला पुरेसे आहे. इंडियन मेडिकल असो.ने विरोधी भूमिका घेतली असली तरी कोणताही वादग्रस्त विषय घ्यायला आपण कचरणार नाही असेही आमीरचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाचा दुसरा स्पेल करण्यासाठीही आमीर उत्सुक आहे.