
श्रीनगर,दि. २५ – श्रीनगरमधील ऐतिहासिक दोनशे वर्ष पुरातन पीर दस्तगीर साहिब दर्गा सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. पीर दस्तगीर यांचे अवशेष सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत जीवित हानी झाली नाही परंतु आगीनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यात २० जण जखमी झाले.
