
मुंबई,दि. २५ – मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली. ग्रामविकास सचिव एस. एस. संधू यांच्या कार्यालयातून उपमुख्यमंत्र्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. मंत्रालयात पुढचे सात दिवस सर्वसामान्य जनतेला प्रवेश मिळणार नाही.
