नोकियाचा शानदार 65 इंच 4के स्मार्ट अँड्राईड टिव्ही लाँच

नोकिया आणि फ्लिपकार्टने आपल्या भागीदारी अंतर्गत देशात तिसरा नोकिया ब्रँड स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. कंपनीने 55 इंच आणि 43 इंचनंतर आता 65 इंच 4के अल्ट्रा एचडी टिव्ही सादर केला आहे. यात पातळ बेझल देण्यात आले आहेत, ज्यामुळे इनफिनिटी एज व्ह्यूइंग अनुभव मिळतो. हा टिव्ही डॉल्बी व्हिजन आणि इंटेलिजेंट डिमिंगसोबत येतो.

Image Credited – Nokia

नोकियाच्या या नव्या टिव्हीत बिल्ट-इन 24 वॉट स्पीकर्स खालील बाजूला देण्यात आलेले आहेत. हे स्पीकर्स डीटीएस ट्रुसराउंड आणि डॉल्बी ऑडिओशिवाय डीप बेससाठी जेबीएलचे ऑडिओ ऑप्टिमायजेसनने सुसज्ज आहे. हा टिव्ही अँड्राईड 9 पायवर चालतो. यात गुगल असिस्टेंट, इन-बिल्ट क्रोमकास्ट सारखे फीचर्स आहेत. गुगल प्ले स्टोरने अ‍ॅप्स देखील डाऊनलोड करता येतील.

Image Credited – Nokia

नोकियाच्या या नव्या टिव्हीत 65 इंच (3840 × 2160 पिक्सल) डिस्प्ले आहे, ज्याचा व्ह्यूईंग अँगल 178 डिग्री आहे. हा स्मार्ट टिव्ही 1 गीगाहर्ट्ज PureX क्वाडकोर कॉर्टेक्स ए53 प्रोसेसरसोबत येतो. ग्राफिक्ससाठी यात माली 450MP4 GPU देण्यात आला आहे. टिव्हीमध्ये रॅम 2.25 जीबी आणि स्टोरेज 16 जीबी आहे.

Image Credited – Nokia

नोकियाच्या या टीव्हीमध्ये वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, तीन HDMI पोर्ट, एक यूएसबी 2.0, एक यूएसबी 3.0 आणि ईथरनेट सारखे कनेक्टिविटी फीचर्स आहेत. नोकियाच्या या 65 इंच स्मार्ट टिव्हीची किंमत 64,999 रुपये आहे. याची विक्री फ्लिपकार्टवर 6 ऑगस्टपासून सुरू होईल.