
मुंबई, दि. २३ – मंत्रालयात लागलेल्या आगीत अकोल्याच्या शिवाजी कोरडे यांचा मृत्यू झाला. अकोला महानगरपालिका जिल्हाअध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी म्हणून धोबी समाजाने त्यांचे नाव सुचवले होते. त्यांच्याबरोबर असणार्या राष्ट्रवादी सेवादलाच्या अनिल मलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये आमदार विनायक मेटे याच्याबरोबर बसलेल्या शिष्टमंडळाला जर बाजूच्या केबिनमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि तिथे असलेल्या लोकांनी आग लागल्याने आपण खाली पळत आहोत हे वेळीच सांगितले असते किंवा अजित दादांना ज्या सिक्युरिटीने बाहेर काढले त्यांनी आम्हालाही सांगितले असते, तर शिवाजी कोरडे यांचा जीव वाचला असता.
