
काबूल दि.२२- अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलजवळील एका पूल रिसॉर्टवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक व एक पोलिस तसेच दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

काबूल दि.२२- अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलजवळील एका पूल रिसॉर्टवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक व एक पोलिस तसेच दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
या रिसॉर्टमध्ये शिरलेल्या तालिबानी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला तसेच ग्रेनेड फेकले. दहशतवाद्यांनी ४० जणांना बंधक केले होते त्यात महिला आणि मुले मोठ्या संख्येने होती. दहशतवाद्यांनी अफगाणी पोलिसांना निशाणा बनविले होते. सतत आठ तास चाललेल्या या चकमकीत अखेर अफगाण पोलिसांनी ३५ ते ४० बंधकांची सुखरूप सुटका केली असल्याचे प्रवक्ते अयुब यांनी सांगितले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले.
विशेष म्हणजे नाटो सैनिकांकडून आता अफगाणी पोलिसांकडे सुरक्षेची सूत्रे येत असल्याने राष्ट्रपती हमीद करजाई यांनी नुकतेच पोलिस आणि नागरिकांवरील हल्ले वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार स्पोझमार्क हॉटेलवर तालिबान्यांनी हल्ला चढविला.
तालिबानी प्रवक्ता जैबिनुल्ला मुजाहिद याने या हॉटेल-रिसॉर्ट मध्ये परदेशी नागरिक दारू पित होते आणि अश्लल चाळे करत होते असे सांगितले असून ही कृत्ये इस्लामविरोधी असल्याने त्यांच्यावर हल्ला केला गेला असे स्पष्ट केले आहे. हल्ल्यात मरण पावलेल्यांत ३ हॉटेल सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.