मुंबई, दि. २१ जून – काय आपल्याकडचे विरोधी पक्ष! कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. याला विरोधीपक्ष म्हणतात पाठिंबा देऊन वर सारवासारवीचे उत्तरे देतात. आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा देत नाही, प्रणवदांना पाठिंबा देत आहोत. का ते बंगाली आहे म्हणून का? असा जोरदार हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर चढविला आहे.
मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर आणि सध्याच्या त्यांच्या राजकारणावर आसूड ओढले. प्रणवदांना पाठिंबा देण्याचे कारण काय, काय तुमचे जीवश्य-कंठश्य मैत्र आहेत का? सारखे सारखे अहमद पटेल मुंबई येऊन जातात कशाला.. आम्हांला कळत नाही का, यांच्या बैठका कुठे होतात ते? ज्या भारतीय जनता पक्षासोबत इतके दिवस काढले, त्या एनडीएचा विचार करायचा नाही. तर का म्हणे त्यांनी उमेदवार दिला नाही. नाही दिला थांबा ना जरा. असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
मागच्या वेळी प्रतिभाताई पाटील.. वर्तमानपत्रात तारखेनुसार माझ्याकडे नोंदी आहेत. की मराठी पंतप्रधान होत असेल तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र यावेत आणि माझा प्रतिभाताईंना पाठिंबा द्यावा, का तर पहिला मराठी राष्ट्रपती होणार आहे. तेव्हा समजू शकतो. पण आता काय कारण आहे, प्रणव मुखर्जींना पाठिंबा देण्याचे? असा जळजळीत सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून मी ठाण्यात पाठिंबा दिला की नाही. पण काय केले नाशिकमध्ये यांनी… कॉंग्रेस आणि एनसीपीबरोबर गेले. यांच्यासोबत युती करायला सांगताहेत का तुम्ही मला.. सत्ताधार्यांबरोबर लगट करणारे हे विरोधी पक्ष यांच्यावर कोण भरोसा ठेवेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी ज्यांना ओ का ठो महाराष्ट्र माहित नाही, नसलेले हे पृथ्वीराज चव्हाण कोंबडे काढून फिरायचे. कधी कोणत्या कॉंट्रवर्सीत अडकायचे नाही. गप्प असणारा माणूस, काम न करणारा माणूस अचानक मतदानाच्या अगोदर बोलतो की, बाळासाहेब ठाकरे या निवडणुकीनंतर निष्प्रभ झालेले दिसतील. मला तेव्हा कळलेच नाही हे का बोलले. तर याचे कारण होते शिवसैनिक चिडावे, मराठी माणसाला वाईट वाटावे आणि जास्त जोमाने काम करून शिवसेनेला मतदान करावे. हे आतले झालेले सेटलमेंट!!! त्यातून आत्ता मिळालेला प्रणव मुखर्जीचा पाठिंबा यातून लक्षात येते की महाराष्ट्रात विरोध पक्ष आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.