
ठाणे, दि. १९ – मराठी शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नसल्याने संस्थाचालकांनी येत्या २ जुलैपासून शाळा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शाळा बंद ठेवणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्य सरकारने २००४ पासून वेतनेतर अनुदान बंद करुन संस्थाचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्यातील ३०-३५ हजार शाळा बंद पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
