संजय दत्तने लटकाविला चित्रपट

अभिनेते मंडळी काही ना काही कारणाने चित्रपट लटकावट असतात. त्याचा त्रास मात्र चित्रपटासाठी पैसा लावणाऱ्या निर्माते मंडळीना होतो.  त्यांचा पैसा अडकून पडत आहे. संजय दत्तने  जिला गाझीयाबाद या चित्रपटाचे चित्रीकरण तारखा उपलब्ध नसल्याने अनेक दिवसापासून रखडविले आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात होऊन एक वर्ष झाले आहे मात्र अजून हा चित्रपट पूर्ण झालेला  नाही. संजय दत्त सोबतच या चित्रपटात विवेक ओबेरॉय व अर्शद वारसी काम करीत आहेत. या चित्रपटात संजय दत्त पोलिस अधिकारी आहे. गेल्या दोन महिन्यापासून संजय दुसऱ्या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने त्यांने डेट दिल्या नाहीत. संजयला वेळ असेल तर विवेक ओबेरॉय व अर्शद वारसी या दोघाना वेळ नसल्याने जिला गाझीयाबाद या चित्रपटाचे काम रखडले आहे.

संजय हा सध्या राजस्थानमध्ये शेर या चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे. त्यामधून त्याची अजून १५ दिवस तर सुटका होणार नसल्याचे समजते. या सर्व प्रकारामागे संजय दत्तचा सचिव धर्म ओबेरॉय हा असून त्यानेच आतापर्यंत जिला गाझीयाबाद या चित्रपटासाठी डेट दिल्या नसल्याचे समजते. चित्रपट निर्माता विनोद बच्चनने जुलै महिन्यात चित्रपट प्रदर्शनची तारीख फायनल केली होती. मात्र उर्वरित चित्रीकरण पूर्ण न झाल्याने या तारखेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.