
पन्नास ओवरचा एकदिवसीय सामना अजून रोमांचक करायचा असेल तर प्रत्येक गोलंदाजाला १२ ओवर टाकू देण्याचा सल्ला भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी क्रिकेट नियामक मंडळला दिला आहे. काही दिवसापूर्वीच भारतातील सर्व माजी कर्णधाराची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वच माजी कर्णधारना मते मांडण्याचा अधिकार देण्यात आला होता.
