भीषण बस अपघातात ३५ ठार,१५ जखमी

उस्मानाबाद दि.१६-शिर्डीहून हैद्राबादला चाललेल्या कावेश्वरी ट्राव्हल्सच्या बसला आज पहाटे (शनिवारी) अडीचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३५ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई-हैद्राबाद महामार्गावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उस्मानाबादजवळ १२ फूट खोल नदीत कोसळली असल्याचे समजते. जखमींना सोलापूर व उस्मानाबाद सरकारी दवाख्यानात हलविण्यात आले आहे.

बसमधील प्रवासी हैद्राबादचे असून ते शिर्डीहून साईदर्शन करून परत जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.