
दिल्ली, दि. ११ – आर्थिक सुधारणांच्या नावावर देशाला रसातळात नेण्याचा कट केंद्र सरकारकडून रचला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक करणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी कृती करणे हे सर्वसामान्य जनतेच्या विरूद्ध कुटील कारस्थान आहे, असे सांगून ते म्हणाले, विदेशी गुंतवणूक, महागाई, पेट्रोलची दरवाढ आणि केंद्र सरकारच्या अन्य लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या २२ जून रोजी भाजपा देशव्यापी आंदोलन करणार आहे.
