
मुंबई, दि. ७ – राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम वेळेत पूर्ण झाला असून, ऊस शिल्लक राहिला नसल्याने अनुदान देण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. शिवाय खरेदी कर, उत्पादन शुल्क या माध्यमातून सरकारला १६०० ते १७०० कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होणार आहे, अशी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. पुढील हंगामासंदर्भात (१२-१३) यशदा येथे एक चर्चासत्र होणार असून येत्या काळात उत्पादनात १५ ते २० टक्क्याने घट अपेक्षीत आहे. सरलेल्या गळीत हंगामात ७७१ लाख मेट्रिक टन गाळप करून ११.६६ या दराने ८९९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे.
