
मुंबई, दि.२ – राज्यात नवीन धान्य गोदामे बांधण्यासाठी नाबार्ड योजनेंतर्गत ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून राज्यात ५८४ ठिकाणी नवीन गोदामे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे सहा लक्ष मे.टन धान्य साठवणुकीची क्षमता नव्याने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली.
