
नवी दिल्ली, दि. ३१ – कच्च्या पोलादाच्या निर्मितीत २०१५ साली भारत जगात दुसर्या क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात सेल आणि आरआयएनएल सारख्या प्रमुख पोलाद उत्पादक कंपन्या विस्ताराच्या योजना आखत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या बैठकीस संबोधित करताना ते बोलत होते.
