
पणजी,दि. २९ – गोव्यासाठी आयएएस व आयपीएस अधिकार्यांची नेमणूक करताना तसेच विद्यमान अधिकार्यांना मुदतवाढ देताना राज्य सरकारला विश्वासात न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाविरूध्द तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला न विचारता हे सर्व करणारे पी. चिदंबरम कोण?’ असा सवालही त्यांनी केला आहे.
