
मुंबई, दि. २९ – देशात सध्या अनेक ठिकाणी ‘मेट्रो’ व ‘हाय स्पीड’ रेल्वे प्रकल्प आखले जात आहेत किंवा त्याबाबतचे प्रस्ताव सादर होत आहेत. हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील, तेव्हा शहरी भागांतील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून गेलेला असेल, असा विश्वास सहाव्या ‘रेल एशिया-२०१२’ परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला. मुंबईत नुकत्याच झालेल्या या परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो रेल प्रकल्पाचे तांत्रिक संचालक एस. पी. खाडे यांना विश्वेश्वरय्या कन्स्ट्रक्शन एक्सलन्स पुरस्काराने गौरविण्यात आले.
