‘एमसीएक्स’चा नफा वाढला

देशातील सर्वात मोठी कमोडिटी बाजार असणार्‍या ‘एमसीएक्स’ला जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत ६५ कोटी २५ लाख रुपयांचा नफा झाला. या तिमाहीत उत्पन्नामध्येही १९ टक्के वाढ झाली असून १५४ कोटी ७१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.


गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने शेअर बाजारात आयपीओ आणला होता या आयपीओतून कंपनीने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी उभारला होता. २०११-१२ या आर्थिक वर्षात कंपनीला ६२८ कोटी ९१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते व २८६ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाला होता. २०११-१२ या आर्थिक वर्षात महसुलात ४१ टक्के व नफ्यात ६६ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या काही महिन्यांमध्ये एमसीएक्स बाजारातील उलाढाल वाढत असून दररोजची सरासरी उलाढाल ५७ टक्क्यांनी वाढली आहे.