
मुंबई- केंद्राने केलेल्या भरभक्कम पेट्रोल दरवाढीविरोधात महाराष्ट्रातही ठिकठिकाणी निदर्शने केली जात असली तरी महाराष्ट्र शासनाच्या खडखडाट असलेल्या तिजोरीत त्यामुळे ३०० कोटी रूपयांची भर २०१२-१३ सालात पडणार आहे. अतिरिक्त विक्रीकरातून हा पैसा जमा होणार असल्याचे अर्थमंत्रालयातील अधिकार्यांचे म्हणणे आहे.
