मुकद्दर का सिकंदरचाही रिमेक येणार

 बॉलीवूडचा बादशहा अमिताभ बच्चनला बॉलिवडमध्ये घट्ट पाय रोवण्यास उपयुक्त ठरलेल्या जंजीरचा रिमेक येत आहे हे आपल्या सर्वांनाच आता ज्ञात झाले आहे. रामशरण तेजाच्या या नव्या जंजीरचे दिग्दर्शन करतो आहे अमित मेहरा. जंजीरचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा हा मुलगा. प्रकाशजी आता या दुनियेत नाहीत. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जंजीरचा रिमेक येतो आहे पण त्याचवेळी मेहरांच्या गाजलेल्या मुकद्दर का सिकंदरचाही रिमेक बनविण्याचे अमित मेहराने निश्चत केले आहे.यात अमिताभने साकारलेला सिकंदर अभिषेक बच्चनने साकारावा अशीही इच्छा अमितने बोलून दाखविली आहे.
   मेहरांच्या गाजलेल्या चित्रपटांचे जागतिक हक्क त्यांची तीन मुले सुमित, पुनित व अमित यांच्याकडेच असून या तिघांनीही लावारिस, शराबी, नमकहलाल, हेराफेरी, हाथ की सफाई या सर्व हिट चित्रपटांचे रिमेक एका पाठोपाठ एक बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Leave a Comment