बैठकीला येणार्‍या कमिटीतील प्रत्येकाची तपासणी – अण्णा हजारे

पुणे,दि.२३-कोअर कमिटीच्या बैठकीतील माहिती फुटणे ही अतिशय गंभीर बाब असून, यापुढे बैठकीला येणार्‍या प्रत्येकाची तपासणीही केली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात  विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.

टीम अण्णांच्या कोअर कमिटीचे सदस्य मुफ्ती शमीम काझमी यांनी बैठकीतील माहिती बाहेर फोडल्याच्या आरोपावरून त्यांची कमिटीतून हकालपट्टीही करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले,  यापुढे बैठकीतील माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी आवश्यक त्या पर्यायांचा अवलंब केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येकाची तपासणीही केली जाणार आहे.

रामदेव बाबांबाद्दल बोलताना अण्णा म्हणाले, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत.