
नाशिक, दि. २३ – नाशिक शहर हे दरोडे व गुन्हेगारीसाठी प्रसिध्द होत चालले आहे. पोलिस आयुक्तांसह सर्व पोलिस कर्मचारी आपले चोख कर्तव्य बजावत असताना काल अचानक मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महात्मा गांधी रोडवरील एका फ़्लॅटमध्ये जुगारी अड्यावर छापा टाकला. तेव्हा नगरसेवकांच्या महिला `पति’ राजांसह तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक हे या ठिकाणी जुगार खेळतांना आढळले. त्यातील काही पकडले गेले, तर काही पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या आदेशान्वये उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या संशयित इमारतीतील फ्लॅटवर छापा घातला. यावेळी जुगार खेळणार्या २२ जणांना पोलिसांनी अटक केली असून, या अड्यावरुन सुमारे अडीच लाख रुपये, ३४ पत्त्याचे कॅटस्, एलसीडी टीव्ही, डीव्हीडी, स्पिकर्स, सीडीज असे साहित्य जप्त केले आहे.
