
पुणे, दि. २१ – जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे धंदे जोरात सुरू आहेत. मटका, दारू आणि वाळू माफियामुळे कादा सुव्यस्था बिघडत असून कोणतही राजकीय हस्तक्षेपाला न घाबरता माफियांचा बंदोबस्त करा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस अधिक्षक शहाजी साळुके यांना दिला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शहराचा किंवा गावाचा विकास कराचा असेल, तर कायदा सुव्यस्था सुरळीत असायलाच हवी. सध्या जिल्ह्यात मटका, दारू आणि वाळू माफिया कायदा आपल्या हाती घेऊ पहात आहेत त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करालाच हवा, आम्ही त्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याचा पोलिस अधिक्षकांनी सल्ला देऊन पवार थांबले नाहीत तर त्यांनी पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे सांगितले, शहरातील लोकांना पिण्यासाठी जेवढी पाण्याची आवश्कता आहे तेवढीच गरज शेतीला पाणी देण्याचीही आहे. यामुळे पाण्याचा योग्य प्रमाणातच वापर व्हाला हवा असे त्यांनी सांगितले.
राज्यात वीज गळतीचे प्रमाण रोखणसाठी उपाययोजना करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण मोठे असून त्यामुळे भारनियमनात वाढ होत आहे. नागरिकांना चोवीस तास वीज वापराला मिळावी यासाठी शेतकर्यांनी कोणत्याही सवलतीची वाट न बघता वापरलेले विजेचे बिल भरावे असे आवाहन पवार यांनी केले.
आम्ही तंटामुक्त होऊ
महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे बक्षीस वितरण माझ्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होत आहे, मात्र मला माहीत आहे आज जिल्ह्यातून आलेले ग्रामस्थ मंत्रीमंडळातील आणि आमच्याच दोघांमधील तंट्या विषयी बोलत आहेत. हा कार्यक्रम दोन वर्षांच्या बक्षीस वितरणाचा आहे, पुढच्या वर्षी चालू वर्षातील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ माझ्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्याच प्रमुख उपस्थितीत होईल आणि तेंव्हा आम्ही तंटा मुक्त झालेले असू याची खात्री बाळगा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
