पुणे, दि. २० – साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या दिवशी येत्या २४ एप्रिल रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सुमारे ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध देसाई बंधू आंबेवाले यांच्यावतीने श्रींना हा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. याच दिवशी पहाटे साडेचार ते सात या वेळेत गायिका शिल्पा पुणतांबेकर यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी साडेसात वाजता विशेष गणेशयाग होणार आहे. अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
