
मुंबई, दि. २० – दूरसंचार नियामक ट्रायने २० रूपयांहून अधिक किंमतीच्या रिचार्ज कूपनवरील शुल्क वाढविण्यास परवानगी दिली आहे. यामुळे देशातील ९० टक्के प्री-पेड मोबाईलधारकांना फटका बसणार आहे. तर २० रूपयांहून कमी मूल्य कूपनच्या शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अडीच वर्षांनंतर टेलिकॉम टॅरिफ ऑर्डरमध्ये तरतूद करून प्रक्रिया शुल्क ५० टक्क्यांनी वाढ करण्यास ‘हिरवा कंदिल’ दाखविला आहे.
२० रूपयांवरील टॉपअप व्हाऊचर्सवरील प्रक्रिया शुल्क २ रूपयांवरून ३ रूपये करण्याचा निर्णय घेतला असून त्या खालच्या व्हाऊचर्सवर ३ रूपयांचे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे ट्रायने म्हटले आहे. दरम्यान, २० रूपयांवरील रिचार्ज कूपन काही दूरसंचार कंपन्यांकडून उपलब्ध होत नसल्याचे ट्रायच्या लक्षात आले असून सर्व कंपन्यांना कमीत कमी १० रूपये मूल्याचे रिचार्ज कूपन उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
