पंढरपूर बस आगाराचे रोजचे उत्पन्न दोन लाख रूपयांनी वाढले

पंढरपूर, दि. १९ – सध्या उन्हाळा हंगाम सुरू असल्यामुळे परगावला जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे पंढरपूर आगाराने जादा बसेस सोडल्या आहेत. आगाराच्या दररोजच्या उत्पन्नामध्ये दोन लाखांनी वाढ झाली आहे. पंढरपूर हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज २५ ते ३० हजार भाविक येत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी प्रयत्न करून राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पंढरपूरात सुरू केले. याचा लाभ  प्रवाशी, भाविक, बस आगाराला होत आहे.
    प्रवाशांच्या सोयीसाठी बस आगाराने नेहमीच्या गाड्यापेक्षा नगर येथे सकाळी ७.३०, ८.३०, ९.३०, लातूर येथे सकाळी ८.३०, उस्मानाबाद सकाळी ७.०० दापोली (कोकण) सकाळी ७.००, शिर्डी सकाळी ११.३०, मुंबई सकाळी ७.३०,  तसेच पुणे, नगर येथेही जादा गाड्या सोडल्या आहेत.