अक्कलकोट, दि. १७ – विवेकानंद प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व सहकार्यांनी वरिष्ठ प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे रविवारी गोरज मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत ३८ लेकींच्या रेशीमगाठी मोठ्या हर्षोउल्हासात लावल्या. दरम्यान शहरातील प्रमुख मार्गावरुन वाद्याच्या गजरात वरातही काढण्यात आली. सुमारे १५ हजार वर्हाडी मंडळीनी विवाहास उपस्थिती दर्शवून भोजनाचा आस्वाद घेतला. प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यासह लेक वाचवा अभियानबाबत जागृती व सहकार्याबाबत यथाशक्ति प्रथम जन्मलेल्या मुलीस दोन हजाराची ठेव योजना जाहीर केल्याने याबाबत कौतुक व आनंद व्यक्त केला जात आहे.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने काळाची गरज ओळखुण सामुदायिक विवाह सोहळा उपक्रम राबवित आहे. यंदा ह्या विवाह सोहळ्यात ३८ जोडप्यांनी नोंदणी केली होती. सर्व धर्माच्या त्यांच्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यात आशिर्वाद देण्यासाठी प.पू. शिवयोगी शिवाचार्य डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, श्रीकंठ शिवाचार्य ताहेरबाशा पिरजादे साहेब, रेवणसिध्द महास्वामीजी व इतर धर्मीयांचे धर्मगुरुनी उपस्थित राहुन शुभाआशिर्वाद दिले.
