सोलापूर, दि. १७ – सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन वैभवात भर घालणारे नान्नज अभयारण्य सध्या खूपच संकटात सापडले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणी व चारा टंचाई जाणवत असल्यामुळे पशुधनाला सांभाळण्याठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असले, तरी नान्नज अभयारण्यातील माळढोक, काळवीट यासार‘या प्राण्यांना मात्र पाणी व चार्याच्या शोधार्थ जीव मुठीत धरुन परिसरात भटकंती करावी लागत असल्याचे दुर्देवी चित्र आहे.
राज्यात उन्हाच्या झळा जाणवण्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. त्यातच यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा ८५ टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जानेवारी २०१२ पासूनच पाणी आणि चार्याची टंचाई जाणवू लागली. पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यातील काही ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात आले. परंतु नैसर्गिक संपत्ती सांभाळ्याकडे मात्र शासन, प्रशासन व वनविभाग डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्यात असलेले प्राणी सध्या पाणी व चार्याच्या विंवचनेत आहेत. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने अभयारण्याला आगी लावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. आधीच उन्हाच्या तीव्रतेमुळे गवत झाडी, झुडपे पूर्णपणे वाळली आहेत. त्यातच अभयारण्यातील गवताला आग लावण्यात येते. त्यामुळे जिल्ह्याचे वैभव असलेला माळढोक सध्या संकटात सापडला आहे. तर काळवीट, लांडगे, कोल्हे, खोकड, ससे यांना परिसरातील शेतीवर पोट भरावे लागते. आग लावण्याच्या प्रकारामुळे अनेकदा गवताबरोबर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षात वनविभागातील अधिकार्यांना आग लावणार्यांचा सुगावा काढण्यात यश आले नाही.
नान्नज अभयारण्यातील प्राण्यांची चार्यासाठी भटकंती पाणी व हिरव्याचार्याचा प्रश्न गंभीर
