
पुणे, दि. १६ – स्नेहवर्धन प्रकाशनच्यावतीने २०१० -११ या वर्षासाठी उल्लेखनीय योगदान देणार्या लेखकांना देण्यात येणारे ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘आनंदाचे अंतरंग’ या ग्रंथासाठी प्रशांत अहिरे यांना ‘डॉ. प्र. जोशी संतमित्र पुरस्कार’, डॉ. विजय बापये यांना ‘कहाणी शस्त्रक्रीयेची’ या पुस्कासाठी ‘डॉ. प्र. जोशी विज्ञान मित्र पुरस्कार’, तर डॉ. वि. कोलते समिक्षामित्र पुरस्कार, ‘मराठी प्रबंध सूची’ या पुस्तकासाठी डॉ. व. कुलकर्णी यांना जाहीर झाले आहेत. याबरोबरच माधुरी पुरंदरे यांच्या ‘लिहावे नेटके’ या पुस्तकाला ‘सजिंवनी मराठे साहित्यसखी पुरस्कार’ तर ग्रामिण साहित्य मित्र पुरस्कार डॉ. द. भोसले यांना जाहीर झाला आहे. तसेच डॉ. प्र. चि. शेजवलकर यांना ‘समाजमित्र पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
येत्या २७ एप्रिल रोजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. तीन हजार रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
