अहमदनगरमध्ये कंटेनरच्या धडकेने २ तरुण ठार

अहमदनगर, दि. १६ – अहमदनगरमधील तारकपूर परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी साडेसातच्या सुमारास घडला. शुभम जालिंदर बेलेकर (१८ राहणार आलमगीर, भिंगार, नगर) व मयुर अनिल बेग (१८ राहणार टेलिफोन क्चार्टर्स, नगर कॉलेज मागे, नगर) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. बेग व बेलेकर ते दोन मित्र सोमवारी सकाळी आपल्या मोटार सायकलवरुन (क्र. एमएस १६ ए आर ३६७४) सावेडी उपनगरातील जीमकडे व्यायाम करण्यासाठी निघाले होते.
    तारकपूर बस स्थानकाच्या पुढे सेंट झेव्हियर्स हायस्कूलसमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने (क्र. आर जे १४ जीडी ३६१७) त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. कंटेनरच्या धडकेने दोन्ही तरुण कंटेनरच्या चाकाखाली अडकले व गाडीबरोबर फरफटत गेले. त्यांच्या जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला.  माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरचा चालक सोनाराम श्रीरामपाल गुजर (जिल्हा- जयपूर, राजस्थान) याला अटक करुन त्याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला.