लॉस एंजेलिस, दि. १४ – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अँजेलिना जोली (३६) हिचा पिट (४८) या हॉलीवूडमधील स्टारसोबत नुकताच साखरपुडा झाला. ते दोघे गेल्या सात वर्षांपासून आपल्या सहा मुलांसोबत एकत्र राहत आहेत. परंतु लग्नाची तारीख अजूनही ठरविण्यात आलेली नाही. साखरपुडा झाल्यामुळे ते दोघेही अत्यंत आनंदी असून त्यांची मुलेही खूप खूष असल्याचे पिटचे प्रवक्ते कँथिया पेट यांनी सांगितले.
अँजेलिनाने तिच्या साखरपुड्यात घातलेली अंगठी प्रसिद्ध ज्वेलरी मेकर रॉबर्ट प्रोकॉप यांनी बनविली आहे. त्यांनी पूर्वीही अँजेलिनासाठी ज्वेलरी डिझायनींगचे काम केले आहे. पिटचा पहिला विवाह जेनिफर एनिस्टन हिच्यासोबत झाला होता. तर अँजेलिना जोली हिचा विवाह अनुक्रमे जॉनी ली मिलर आणि बिली बॉब थॉर्नटन यांच्यासोबत झाला होता
