मालदिवचे परराष्ट्रमंत्री येणार भारतदौर्‍यावर

नवी दिल्ली, दि. २ – मालदिवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल सामद अब्दुल्ला भारतीय परराष्ट्रमंत्री  एस. एम. कृष्णा यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. त्यामुळे मालदिवमधील परिस्थितीचा आढावा भारताला घेता येणार आहे.
 अब्दुल सामद अब्दुल्ला भारतात येवून कृष्णा यांची मंगळवारी भेट घेतील आणि चर्चा करतील असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनी सांगितले. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मालदिवचे पहिले राष्ट्राध्यक्ष नशीद यांनी ७ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यामुळे मालदिवमध्ये राजनैतिक उलथापालथ निर्माण झाली. दरम्यान, नशीद देखील एप्रिल महिन्यात भारताच्या दौर्‍यावर येऊन, येथील नेत्यांकडे आपले मन मोकळे करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.