कोल्हापूर, दि. २९- आंध्र प्रदेश-कर्नाटक-महाराष्ट्रातील पाच लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती असणार्या दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी चैत्र पोर्णिमेला या यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. मात्र त्यासाठी एकादशीपासून म्हणजे २ एप्रिलपासून भाविक येण्यास प्रारंभ होतो. बेळगावातील ७० हून आधिक भाविक बैलगाडयांसह या दिवशी ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल होतील.
मांढरदेवी दुर्घटनेनंतर राज्य सरकारने लागू केलेल्या विविध सूचनांची यात्रेमध्ये काटेकोट अंमलबजावणी केली जात आहे. यात्रा दरम्यान ५ ते ७ एप्रिल या तीन दिवसात ज्योतिबा डोंगरावर जाण्यासाठी वाहनासाठी एकेरी वाहतूक यंदाही असणार आहे. जोतिबा परिसरातील कुशिटे, दानेवाडी, शिरोली, पोहळे या गावातील पाणी शुद्धीकरण मोहिमही युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे.
