
नवी दिल्ली, दि. २५ मार्च- केंद्रीय नियोजन आयोगाने दारिद्य्ररेषेची किमान पातळी निश्चित करण्यासाठी जाहीर केलेल्या निकषांवर समाजाच्या सर्वच स्तरांतून टीका होत असताना आता केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनीही याबाबत टिपण्णी केली आहे. देशातील गरीबांची नेमकी मोजदाद करण्यासाठी केंद्रीय नियोजन आयोग सर्वोत्तम सर्वेक्षण पद्धतीचाच आधार घेते. परंतु, याच्यातही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रमेश यांनी केले.
