जमुई, दि. २२ – बिहारमधील जमुई जिल्हयात माओवाद्यांनी बुधवारी रात्री रेल्वे रुळावर स्फोट घडवून आणला. तसेच, दोन मोबाईल टॉवर्सना आग लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माओवाद्यांच्या सशस्त्र समुहाने नरगंजू रेल्वे स्टेशन जवळील रुळावर स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. याचबरोबर, सनोवर परिसरात दोन मोबाईल फोन टॉवर्सना आणि टॅक्टरला आग लावल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले.
माओवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, बिहार आणि झारखंडमध्ये पाच मुख्य नक्षलवादी म्होरक्यांना अटक केल्यामुळे माओवाद्यांनी या दोन राज्यांत बंद पुकारला आहे.
