टीक-टॉकवरील लोकप्रियता पडली महागात, महिलांना दोन वर्षांच्या कारावासासह 14 लाखांचा दंड

इजिप्तच्या एका न्यायालयाने टीक-टॉकवर बीभत्स नृत्याचा व्हिडीओ पोस्ट केल्याच्या आरोपाखाली 5 युवतींना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. समाजातील वातावरण खराब करण्याच्या आरोपाखाली प्रत्येक महिलेला तीन लाख इजिप्शियन पाउंड (जवळपास 14 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.  

एका वकिलाने सांगितले की, इजिप्तमध्ये पारंपारिक मुल्य आणि सिद्धांतांचे उल्लंघन करणे, भावना भडकवणे आणि मानवी तस्करी प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली हा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिलांमध्ये दोन जणींचे वय 20 आणि 22 वर्ष आहे. तर अन्य महिलांनी त्यांना सोशल मीडियावरील अकाउंट चालवण्यास मदत केली.

हनीम आणि मोवादा या दोन युवतींनी टीकटॉकवर कारमध्ये मेकअप पोज देणे, किचनमध्ये डान्स असे विविध व्हिडीओ शेअर करत लोकप्रियता मिळवली होती. मात्र हीच लोकप्रियता आता त्यांना महागात पडली आहे. हनीम आणि मोवादाचे टीक-टॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. मोवादाने टीक-टॉकवर व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका देखील केली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघींना एप्रिल महिन्यात अटक केले होते.