भारताकडून धोका असल्याचे पाकिस्तानचे मत कायम – डेम्प्सी

वॉशिग्टन, दि. १७ -पाकिस्तानला दहशतवादी कारवायांमुळे जास्त धोका संभवतो याकडे अमेरिका जरी पाकिस्तानचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करीत असली, तरीही भारताकडूनच जास्त हानी पोहचू शकते असे पाकिस्तानला वाटत असल्याचे एका उच्च अमेरिकी सेनापतीने सांगितले.
देशासाठी दहशतवाद जास्त हानिकारक आहे असे आम्ही सांगत असताना देखील भारताकडूनच पाकिस्तानला जास्त धोका संभवतो असे पाकिस्तानचे मत आहे, असे जनरल मार्टिन डेम्प्सी यांनी सांगितले.