नवी दिल्ली, दि. १६ – भारताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी सादर केलेल्या २०१२-१३ अर्थसंकल्पात जम्मू-काश्मीरमध्ये उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरसाठी विशेष उद्योग उपक्रम म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाला दीडशे कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे मुखर्जींनी अर्थसंकल्प सादर करत असताना लोकसभेत सांगितले. राज्यातील तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्याव्यात यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही गेल्या काही काळापासून प्रयत्न केले होते. त्यातूनच राज्यात उद्योग वृध्दीसाठी अर्थसंकल्पात खास तरतूद करण्यात आली आहे.
