
नवी दिल्ली, दि. १५ मार्च- केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाचा आपण अद्याप राजीनामा दिलेला नसल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मला अद्याप ममता बॅनर्जी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिह यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे मी अद्याप राजीनाम दिलेला नाही, असे त्रिवेदी यांनी यावेळी सांगितले.
त्रिवेदींनी आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तब्बल आठवर्षांनंतर प्रवासभाड्यात वाढ केली. त्यावर त्यांच्यांच पक्षाच्या नेत्यांनी या भाडेवाढीचा कडाडून विरोध केला होता. तसेच तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनीही या भाडेवाढीचा निषेध केला होता. व त्यांनी दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशीरी त्रिवेदी यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे पाठविल्याचे सांगितले जात होते. मात्र त्रिवेदींना त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले.
देशाचा रेल्वे मंत्री म्हणुन मी आपली जबाबदारी पार पाडली आहे. रेल्वे अर्थसंकल्प योग्य असून सर्वांच्या हितार्थ आहे, असे त्रिवेदी यांनी बंगाली वृत्तवाहिनी स्टार आंनदशी बोलताना सांगितले.
