सेंद्रीय शेती हेच भारताचे प्राचीन वैभव आणि उज्वल भविष्यकाळ वसुंधरा महोत्सवात ना धो महानोर यांचे आवाहन

पुणे-ऋषी आणि कृषी संस्कृतीचा आपला देश जगाला शिकवीत होता.हे सगळे आम्ही घालवून बसलो.जमिनीची,मातीची,पिकाची,शेताची आणि खेड्यापाड्याच्या श्रीमंतीची रया गेली.यातून बाहेर पडण्यासाठी आंतरपीक पद्धतीने जैविक शेतीशिवाय पर्याय नाही,असे मत ज्येष्ठ कवी आणि प्रगतीशील शेतकरी ना. धों. महानोर यांनी व्यत्त* केले. पर्यावरण रक्षणाचे काम विसरुन प्रदूषण हाच परवलीचा शब्द होणार का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट* साहित्य परिषद आणि क्लब वसुंधरा यांच्यातफर्े आयोजित वसुंधरा महोत्सवातंर्गत पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महानोर यांनी भूषविले. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिद जोशी आणि क्लब वसुंधराचे वीरेंद्र चित्राव याप्रसंगी उपस्थित होते. पालखीतील वृक्षाला जल अर्पण करून या संमेलनाचे उदघाटन झाले. त्यापूर्वी महाराष्ट* साहित्य परिषद ते बालगंधर्व रंगमंदिर अशी वृक्षदिडी काढण्यात आली.
महानोर म्हणाले, वनविकास आणि त्यातूनच शेती, पाणी असा सगळा विकास यासाठीचे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आज्ञापत्र सर्वांनाच ज्ञात आहे. अहिल्याबाई होळकर यांनी पाणी, तलाव, जंगल-झाडी, पशु-पक्ष्यांसाठी राखीव शेती याकडे बारकाईने पाहिले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे तुकोबा आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा घोष करणारे सावतामाळी हे संत आहेत. संतांचे विचार समाजाने प्रत्यक्ष योजनांमध्ये आणि जीवनात अंगिकारून माणसांनी, जगण्याची, भुकेची आणि पाणी, पाऊस, दुष्काळ यातून वाट काढली.
एका बाजूला पर्यावरणाची निगा राखणारे आणि दुसर्‍या बाजूला प्रदूषण करणार्‍या माणसांची मोठी संख्या असे विषम गुणोत्तर आहे. आता हिरवाई सोडून गेली आहे. निसर्गावरची कविता ऊभी राहिली. पण, त्या कवितेतील सत्व निघून गेले अशी परिस्थिती आहे. भरगच्च हिरव्या झाडीची, शेती-मातीतल्या मृदगंधाची आणि पाखरासोबत निर्मळ शुद्ध प्रेम करणार्‍या रसिकांची शत्त*ी माझ्या कवितेला मिळाली. मात्र, सध्याची उदध्वस्तता आणि मोडतोड पाहून प्रचंड खिन्नता व्यापून राहते. आपला विनाश कुठपर्यंत पोखरत जाणार याची चिता वाटते. स्वातंत्र्योत्तर काळात वाढणार्‍या लोकसंख्येवर आपल्याला अंकुश ठेवता आला नाही. भौतिक गरजांसाठी इमारती, घरे, पाणी आणि अनेक कारणांसाठी भूगर्भातील पाणी, पाणीसाठे, धरणे आणि जंगलसंपत्ती बेहिशोबीपणे आपण वापरत आहोत. शहरांमध्ये तर प्रत्येक गरजेसाठी पाचपच तरी पाणी आपण वापरतो. हे चित्र राज्याला आणि देशाला बिकट अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाणार आहे. या गोष्टी मनाच्या प्रदूषणाशी आणि भ्रष्टाचाराशी निगडीत आहेत, असे महानोर यांनी सांगितले.
पाणलोट क्षेत्रविकास आणि जलसंधारण योजनेतील फत्त* दहा-वीस टक्के कामाची पूर्तता होते. बाकी पैसे पडून राहतात किवा परत जातात. ही निष्क्रियता कोणाची. लोकप्रतिनिधी, अधिकारी की जनता याला जबाबदार कोण तर कोणीच नाही. हे असेच चालणार असेल तर, पर्यावरण विसरून प्रदूषण हाच शब्द पक्का होणार याकडे लक्ष वेधू महानोर म्हणाले, शेती लहान झाली हे वास्तव असले तरी बांधावर किमान झाडे का नकोत. रासायनिक खतांचा वापर टाळून सजीवांनी सजीवांसाठी केलेली शेती म्हणजे सेंद्रीय शेती. शेतातील टाकाऊ, जैविक खतांचा वापर करून कालांतराने होत जाणारी स्वयंविकसित, स्वयंपोशी शेती म्हणजे सेंद्रीय शेती. हे सगळे एकमेकांमध्ये सरमिसळ होऊन व्हावे म्हणजे पर्यावरणाला आकार मिळेल.
यावेळी महानोर यांनी पाणी पाणी पाणी अन पाणी पाणी पाणी पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी ही कविता सादर केली. वीरेंद्र चित्राव यांनी स्वागत केले. डॉ. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मिलिद जोशी यांनी आभार मानले.
……………………………..