अमेरिकेने पाकिस्तानची ७० कोटी डॉलर्सची मदत थांबविली

वॉशिग्टन दि.१३ डिसेंबर- अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चालले आहेत. दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.याचाच परिणाम म्हणून अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी ७० कोटी डॉलर्सची मदत अमेरिकन सिनेटने थांबविली आहे.पाकिस्तान जोपर्यंत इम्प्रूवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसेस (आयईडी) मुळासकट नष्ट करण्यासाठी अमेरिकेला मदत करीत नाही, तोवर पाकला मदत केली जाऊ शकत नाही, असे अमेरिकन सिनेटकडून सांगण्यात आले.

दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमधील अमेरिकन जवानांना लक्ष्य करण्यासाठी आईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. शिवाय अनेक बॉम्बहल्ल्यांमध्ये आईडीचा वापर केला जातो. आईडी नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने आम्हाला मदत करण्याचे आश्वासन द्यावे, असे रिपब्लिकनचे पक्षाचे प्रतिनिधी हावर्ड मॅकेऑन म्हणाले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने मदतीच्या नावावर पाकिस्तानला वर्ष २००१ पासून आतापर्यंत सुमारे २० अब्ज डॉलर्स इतका पैसा दिला आहे. मात्र पाकिस्तानने दहशतवादाला लगाम घालण्याऐवजी त्याला प्रोत्साहनच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल अमेरिकन नेत्यांनी असंतोष व्यत्त* केला. दहशतवादी खत बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांतून बॉम्ब बनवून त्याची पाकिस्तानातून अफगाणिस्तानात तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकन सैनिकांना मारण्यासाठी जास्त प्रमाणात आईडीचा वापर केला जातो. पाकिस्तानच्या दोन खत कारखान्यांत ही रसायने बनविण्यात येतात, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे जॉन मॅक्किन यांनी केला. पाकिस्तानला मदत म्हणून देण्यात येणारे ७० कोटी डॉलर्स थांबविण्याच्या निर्णय सहमतीने सहमतीने घेण्यात आल्याची माहिती जॉन यांनी दिली.