
मुंबई दि.१४ नोव्हेंबर- बेस्ट उपक्रमाने राज्य सरकारच्या परवानगीविना नियमबाह्यपणे कर्जावर कर्ज घेतले. त्यामुळे मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम २४०० कोटी रूपये कर्जात बुडाला आहे. बेस्टने आपला गैरकारभार व पैशांची उधळणपट्टी त्वरित थांबवावी, अन्यथा एक दिवस बेस्ट उपक्रमच बंद पडेल, असा इशारा मुंबई महापालिका लेखापरिक्षकांनी आपल्या अहवालात दिला आहे.
