
दिल्लीतील स्फोटांनी जेहादी दहशतवादी हल्ल्यांनी देशाच्या सुरक्षेच्या दरवाज्यावर पुन्हा एकदा थाप दिली आहे. जेहादी दशहतवादी हल्ल्यांचे वैशिष्ठ्य असे की, अशाच हल्ल्यातून प्रचंड दहशत निर्माण करणे व त्याच्या आधारे प्रभावक्षेत्र निर्माण करणे. पाकिस्तानात गेल्या साठ वर्षात फक्त हीच पद्धती परिणामकारक ठरली आहे. भारतात गेल्या एकहजार अकरा वर्षात हीच पद्धत प्रामुख्याने वापरली गेली आहे. बांगला देशपासून लिबियापर्यंत तीच पद्धती वापरली गेली आहे आणि युरोपवर हल्ले करतानाही हीच पद्धती वापरली गेली आहे. भारतात गेली हजार वर्षे वापरल्या गेलेल्या पद्धतीवर कधी तरी गांभिर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
दिल्ली न्यायालयात बुधवारी सकाळी स्फोट झाल्याने स्फोटाच्या समस्या निस्तरण्याला पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ झाला आहे. यापूर्वी आठवणीतील स्फोट म्हणजे मुंबईतील दादर, मेट*ोसिनेमा आणि झवेरीबाजारातील स्फोट मालिका. कालपर्यंत तो स्फोट ही दहशतवाद्यांच्या हल्ल्याची मोठी घटना मानली जायची. त्यापूर्वी पुण्यातील जर्नन बेकरीतील स्फोट अशीच मोठी घटना मानली गेली होती. सरकारची देशातील सर्व यंत्रणा त्याच्या मागे लागली होती त्यापूर्वी मुंबईचा २६। ११चा स्फोट हा मोठा वाटायचा. अलिकडे प्रसारमाध्यमामुळे त्या त्या वेळी ऐरणीवर असलेल्या विषयाला सुनामी महत्व येते. पण दुसरा स्फोट होईतर्यंत तो विषय विस्मरणात जातो. एखादा स्फोट झाला की या देशाचे नुकसान करण्याची त्या त्या दहशतवाद्यांची एक पद्धती असते ती म्हणजे असे स्फोट झाल्यावर देशभर जो हाय अलर्ट घोषित होतो आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त त्यासाठी वापर केला जातो त्यात या दहशतवादी संघटना अगदी तिसर्याच दिवशी दीडपट वाढ करून घेतात. आजपर्यंत अपवादानेही यात बदल झालेला नाही. आणि तो बंदोबस्त दीडपट वाढविण्यासाठी नेहेमीचेच कौशल्य वापरले जाते ते कौशल्य म्हणजे अशाच स्वरुपाच्या अजून एक हल्ल्याची शक्यता दाखवून द्यायची. देशातील पाच सहा हजार सुरक्षा यासाठी लागून रहाते. ते साधारणपणे दीड ते दोन वर्षे सतत तसेच राहते नंतर न कळत त्यात थोडी थोडी कपात होते. प्रत्यक्षात नंतर हल्ला होतो तेंव्हा यापूर्वीची सुरक्षा व्यवस्था टाळून अन्यत्रच होत असते. देशात आज सेना आणि पोलीस यांची त्यांच्याकडून जी अपेक्षित कामे असतात अशा कामाला लागणार्या संख्येयेवढीच यंत्रणा आजही केवळ दशहतवादी यंत्रणेचा सामना करण्यासाठी वापरली जात असते. कदाचित ही यंत्रणा सेना आणि पोलीस यांच्या यंत्रणेपेक्षा दुप्पटही असण्याची शक्यता आहे. अगदी सध्याचेच उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईचा जव्हेरी बाजार,दादर स्फोटमालिकानंतर राज्यातील (बहुदा देशभरातील )सर्व हौसिग सोसायट्या, बाजारपेठा, कारखाने, विद्यापीठे, औद्योगिक वसाहती, हॉटेले यांना कडक सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही यांची सक्ती केली आहे. एकाच दिवशी तीन ते चार लाख सुरक्षा रक्षकांचा खर्च वाढला आहे. हा खर्च योग्य की अयोग्य यावर जाणकार टिपणी करतील पण एक गोष्ट खरी की, अशी व्यवस्था करण्यामागे राज्यव्यापी सुरक्षा यंत्रणेचा सुसूत्र विचार दिसत नाही. दहशतवाद्यांचा शोध घेअून त्यांचा सामना कसा करायचा यावर काही प्रशिक्षण सत्रे होत आहेत किवा जगात आज अनेक ठिकाणी सहकारी सोसायट्यांच्या सुरक्षारक्षकांनीच अमेरिकेत व युरोपमध्ये मोठमोठ्या स्फोटांच्या शक्यता उघड केल्या आहेत आपल्याकडे अशा सुरक्षांचा प्रत्यक्ष परिणाम दैनंदिनी जीवनातील व्याप वाढणे याखेरीज अन्य काही होताना दिसत नाही. या विधानाचा असा अर्थ नव्हे की, अशी यंत्रणाच बसवू नये. ती बसवणे योग्य तर आहेच पण ज्या दशहतवादी हल्ल्यापासूनच्या संरक्षणासाठी ती सुरु होते त्यादृष्टीने अतिशय आवश्यक ठरणारे प्रशिक्षण आणि वारंवार पुन्हा प्रशिक्षण हे होत नसेल तर ती यंत्रणा असूनही नसल्यासारखी होअून जाते याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत.
भारतात हल्ले करण्याची जबाबदारी अलिकडे अल्-कायदा वगैरे संघटनांनी झटकली आहे त्यामुळे भारतातील हल्ल्यासाठी तेथील दहशतवादी संघटनांनी आमच्यावर अवलंबून राहू नये, आपापले बघाव, असे जाहीर केल्याचे वृत्त मुंबई स्फोटमालिकेनंतर आले होते. हे खरे असेल की नसेल हे सांगता येणे कठीण आहे पण २६।११चा मुंबईचा हल्ला आणि दोन महिन्यापूर्वीची जव्हेरी बाजार,दादर वगैरे भागातील स्फोट मालिका यातील गुणात्मक आक्रमकताच निराळी होती हे निश्चत. उद्या कदाचित हे हल्ले अल्-कायदाचे मुख्यालय असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरील भागाऐवजी ते बांगला देशातूनही होताना दिसतील पण सार्या जगात जर जेथून हे हल्ले सुरु आहेत तेथेच त्याचे प्रमुख मुख्यालय असणार आहे. याची अजून एक म महत्वाची एक पाश्र्वभूमी आहे. अल्-कायदा हे संघटित हल्ले करणारे नाव म्हणून गेल्या तीस चाळीस वर्षातील असले तरी इ.सन ७११ साली या देशावर झालेले पहिल्या पहिल्या महंमद बिन कासीमच्या आक्रमणाचे मुख्यालय तेच होते आणि नाव जरी निराळे असले तरी जाहीर केलेले उद्दिष्टही अल्-कायदाचेच होते.
बेसावधपणे प्रचंड दहशत निर्माण करणारे हल्ले सुरु ठेवणे आणि त्यानंतर सर्वांना जीव मुठीत घेअून सतत पळत ठेवणारे वातावरण कायम ठेवून लूट करणे रहाणे हे महंमद बिन कासीमपासून सुरु झालेला प्रकार आहे. पण महंमद बिन कासीमचे पहिले आक्रमण आणि नंतर इ.न.१०००साली झालेले दुसरे आक्रमण यात मोठा काळ मधे गेला आहे. कासीमच्या आक्रमणाचा परिणाम सुमारे पन्नास वर्षे होता. पण इ.स.१००१मध्ये जे गझनीच्या महंमदाचे अगदी २६।११सारखे स्फोट सुरु झाले तर नंतर आठशेवर्षे पर्यंत भारतात दररोज सर्व घरोघरच्या भितीवरील ताकर्ेटमध्ये फक्त एकच तारीख पडत होती ती म्हणजे २६।११. त्याकाळी घरोघरी ताकर्ेटे कोठे होती आणि एकच तारीख आठशेवर्षे कशी पडेल, अशी शंका अनेकांना येईल पण याचा अर्थ समजणारास निराळ्या शब्दाची गरज नाही. रात्रंदिवस प्रचंड हल्ले, प्रचंड दहशत, यातून विटंबना, आत्मविश्वासाची हानी ही परिणाम एक हजार वर्षे सुरु होता. या काळात किती लूट झाली आहे. याव जगभर अभ्यासही झाला आहे. तो हिशोब थोडक्यात सांगायचा झाला तर स्वातंत्र्यानंतरच्या चौसष्ट वर्षा स्वीस बँकेत काळा बाजारवाल्यानी सुमारे चारशे लक्ष कोटी रुपये ठेवले आहेत.त्यात साठ वर्षात चिरीमिरीमधून बाहेर गेलेली रक्कम जर चारशे लक्ष कोटी तर मग २५।११सारखे हल्ले करून आठशे वर्षात किती गेली असेल याचा विचारच केलेला बरा.ज्याना या रकमेविषयी शंका आहे त्यानी इतिहासाची पुस्तके बघावी. आणि गेल्या चौसष्ट वर्षात चारशे लक्ष कोटी रुपये गेले हे तरी खरे का याला स्वामी रामदेव यानी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्याचे म्हणणे एका हसन अलीची रक्कम जर एक लक्ष कोटीच्या घरात असेल तर देशातील अशी किती नावे देवू?
बर्याच वेळा अशी शंका व्यक्त केली जाणे शक्य आहे की, देशाची लूट किती झाली याचा हिशोब हा ‘चौसष्ट वर्षात जर चारशे लक्ष कोटी तर आठशे वर्षात किती असेल’ अशा त्रैराशिकाने मांडता येईल का ? आणि झाला दहशतवादी हल्ला की उकरला जुना इतिहास, असे योग्य तरी आहे का. अशा पद्धतीने सध्या आपण ज्या मुसलमान समाजाबरोबर राहतो त्यंाच्याबरोबर त्यांच्या मनात कायम असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही का आणि अशा वातावरणाने या देशाच्या घटनेचा धर्मनिरपेक्षतेचा पाया आणि सामाजिक सौहादा्रर्ता नाहीशी होणार नाहीना ! अशा शंका व्यक्त होत असतात. ते सहाजिकही आहे. त्यामुळे सार्या मुसलमान समाजाला गुन्हेगाराच्या पिजर्यातच बघितले जाते, हे तरी योग्य का असाही मुद्दा पुढे येतो आणि त्यातही तथ्य नाही असे नाही पण एका दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपायच्या आता जर दुसरा हल्ला होत असेल तर त्या हल्ल्याच्या मुळाचा विचार करावा लागेल, असा मुद्दा आता मुसलमान समाजानेही करायला आरंभ केला आहे. या आठवडयात पुण्यात सुरु झालेल्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमबंधू गणेशोत्सवात सहभागी झाले होते आणि पुण्यात मुस्लीम कुटुंबियांनी घरी गपतती बसविल्याची उदाहरणेही आहेत. त्यामुळे वस्तुस्थितीची जाणीव सर्वांनाच होअू लागली आहे आणि काहीही कारण नसताना जर दर तीन महिन्याला असा हल्ला होत असेल तर त्याचा उगम केंव्हापासून आहे याचा वेध न घेणेही मूर्खपणाचे ठरणार आहे.
गेली साठ पासष्ट वर्षे देशाचा व्यवहार चालवण्याचा विचार फक्त राजकीय दृष्टीकोनातून करावा लागला आहे. पण आता देशात नवे वातावरण निर्माण होते आहे. राजकीय मंडळी अपरिहार्यपणे सरकार चालविण्यास आवश्यक अशा बहुमताच्या अपरिहार्यतेच्या दृष्टीकोनातूनच फक्त विचार करत असतात आणि सहाजिकच आहे कारण ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशा सरकार टिकवण्याच्या जीवघेण्या खेळातून त्याना जावे लागत असते त्यामुळे त्यांच्याकडून फार काही निराळे होईल, असे अपेक्षिणे योग्य नाही. पण सामान्य माणसानेच या पद्धतीने विचार करायला आरंभ केला की त्याचाही निश्चत परिणाम होईल.
केंद्रात सध्या राजकारण्याचे भ्रष्टाचार आणि अण्णा हजारे यांचे आंदोलन हे विषय ऐरणीवर आहेत. चार वर्षापूर्वी हे विषय ऐरणीवर नव्हते निराळेच काही विषय होते पण पाकिस्तानात कोणताही मुद्दा सोडविण्याचा एकच मार्ग म्हणजे दहशतवादी हल्ला. उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व येथील देशांची निराळी स्थिती नाही. कांही वर्षापूर्वी जॉर्डनमध्ये एकाची सत्ता अशीच दहशतवादाच्या आधारे घालवून दुसरी सत्ता आली. त्यावेळी अमेरिकेसह सर्व देशांची प्रतिक्रिया अशीच होती की, तेथे लोकशाहीचा खून होतो आहे. अशी पाशवी सत्ता असता कामा नये वगैरे. पण इझ्राईलची प्रतिक्रिया निराळीच होती. त्यांच्या परराष्ट*विभागाची प्रतिक्रिया एका ओळीची होती. ती अशी होती की, ‘ त्यांची सत्तांतराची ती पद्धतच आहे’ याची आज आठवण व्हायची झाली तर ‘ त्यांची सत्तांतराची ती पद्धतच आहे’ हे विधान गेली एक हजारवर्षे भारताला लागू होत आहे. पाकिस्तानमधील प्रत्येक घटनेला तीच पद्धती परिणामकारक ठरली आहे. इजिप्त, ट्यूनिशिया, लिबिया या देशातही हीच पद्धत परिणामकारक झाली आहे. आपण मात्र दिल्लीचा स्फोट झाल्यावर २६।११, जर्मनी बेकरी आणि जव्हेरीबाजार हे सारे प्रकार इतिहासजमा करतो. गेल्या हजार वर्षात युरोप, आफ्रिका आणि आशियातील प्रत्येक घटना जर याच सूत्राने चालवली गेली असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला आज जेथे सोसायटीगणीक सुरक्षा वाढवावी लागत आहे ती नंतर प्रत्येकासाठी जरी तेवढी सुरक्षा वाढविली तरीही उत्तर मिळणार नाही.
इ.स.१००१गझनवीच्या महमदाने आक्रमण केले त्याने केलेल्या पंधरा स्वार्या या अमेरिकेतीनल ९।११ची आठवण करून देणार्या होत्या. एकेका स्वारीत प्रचंड दशहत निर्माण होत असे आणि सहजासहजी प्रचंड लुटालूट करता येत असे. महंमद गझनवीने जसा तीस वर्षे सतत स्वार्या करून दशहत निर्माण केली त्याप्रमाणे महंमद घोरीने बाराव्या शतकात सतत तीस वर्षे अशाच स्वार्या केल्या. या दोन महाआक्रमकांच्या दरम्यानच्या काळात त्यांची पिलावळ लुटालुटीचे काम करत असे. त्यानंतर कुतुबुद्दिन ऐबक, रशिया सुलताना, अल्लाउद्दिन खिलजी, तुघलख घराणेही अशी प्रत्येक शतकात किवा अध्या शतकात आज असणार्या आपल्या देशातील पाउणपट क्षेत्रावर दहशतीचे राज्य करीत राहिले. दक्षिणेतील महामनी राज्ये आणि अन्य भागातील छोटी छोटी इस्लामी राज्ये अशाच स्फोट आणि हल्लेयातून राज्ये करीत होते. बाबरची वंशावळ या देशावर १५१९मध्ये राज्य करू लागली. त्या वंशावळीचे या देशावर दोनशे वर्षे साम्राज्य होते आणि कार्यपद्धती फक्त प्रचंड दहशत निर्माण करणे येवढीच होती. या सार्या आक्रमणाला उत्तर देण्याची ऐपत फक्त शिवाजी महाराज यांच्यात होती. त्यानी त्याला आरंभ केला आणि बाजीराव यांनी ते पूर्ण केले.
यातील महत्वाचा मुद्दा असा की उत्तरेकडून जी आक्रमणे झाली ती सारी कधी गझनी तर कधी कंधाहार अशी होती म्हणजे आज जेथे अल् कायदाचे मुख्यालय होते तेथूनच होती आणि आक्रमणाचे तत्वज्ञानही तेच होते. गेल्या एक हजार वर्षात जगातील पन्नासपेक्षा अधिक देशात जर एकच तत्वज्ञान लागू होत असेल तर आपणही दिल्लीस्फोट झाली की जव्हेरी बाजार, जर्मन बेकरी आणि २६।११ या स्फोटांचा परिणाम दुर्लक्षून चालणार नाही. या सार्यावर परिणामकारक उत्तर हवे असेल तर या सार्या बाबींचा विचार करावा लागेल.
– मोरेश्वर जोशी, पुणे
