
लंडन दि.७-डोमिनो या जगप्रसिद्ध पिझ्झा कंपनीने चंद्रावर पहिले पिझ्झा रेस्टॉरंट सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्यांची या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या पिझ्झा हटने पृथ्वीच्या अंतराळक क्षेत फिरत असलेल्या अंतराळयानातील अंतराळवीरांना अंतराळात पिझ्झा पुरविल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. डोमिनोने आपला २५ वा वर्धापन दिन जपानमध्ये गेल्यावर्षी शाखा उघडून साजरा केला होता. त्यावेळी अनेक कार्यक्रमही करण्यात आले होते. आता कंपनीने मिडा कॉर्प या बंाधकाम क्षेत्रातील कंपनीकडून डोम आकाराचे कॉक्रीटचे रेस्टॉरंट थेट चंद्रावरच बांधण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाची किमत अंदाजे १३.४ अब्ज पौंड इतकी आहे. त्यातील चाडेचार अब्ज पौंड या रेस्टॉरंटसाठी आवश्यक असलेले ७० टन बांधकाम मटेरियल १५ रॉकेटमधून चंद्रावर नेण्यासाठीच खर्च होणार आहेत. यात पिझ्झासाठीची मशिनरीही अंतर्भूत आहे. कॉक्रीटसाठी चंद्रावरील क्षार खनिजे वापरून दीड अब्ज पौंडाची बचत बांदकाम खर्चात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सव्वीस मीटर व्यासाचा हा दुमजली डोम असणार आहे.
गतवर्षीपासूनच चंद्रावर रेस्टॉरंट उघडण्याचा कंपनीचा विचार सुरू होता असे डोमिनोचा प्रवत्त*ा टोमोहाईड मॅटसुंग याने सांगितले असून हे रेस्टॉरंट नक्की कधी सुरू होणार याचा खुलासा मात्र त्याने केलेला नाही. त्याच्या मते भविष्यात अनेक लोक चंद्रवर वास्तव्य करतीलच आणि तेथे वास्तव्य करणार्या अंतराळवीरांबरोबरच तेथील चंद्रवासी नागरिकांना पिझ्झाची गरज भासणारच असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
