
त्रिपोली दि.६ सप्टेंबर- लिबियाचे पदच्युत हुकूमशहा मुहम्मर गदाफीना पळवून लावण्यास बंडाळींना यश आले असले तरी अद्यापही त्यांनी हार मानली नाह.गुप्त ठिकाणी आश्रय घेतलेल्य गद्दाफीची प्रकृती सुखरूप आहे.या काळात त्यांनी आपल्या समर्थकांची जुळवाजुळव करत बचाव पथक उभारले असल्याची माहिती प्रवक्ते मोसा अब्राहिम यांनी एका स्थानिक दुरचित्रवाणीला दिली.
सत्तेपासून आम्हाला बाजूला सारले असले तरी अद्यापही कुवत बाकी आहे.यापुढे ही आम्ही लिबियाला अरबांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न करू असे अब्राहिम यांनी म्हटले आहे.नाटोचे सैनिकांनी येथे मोठ्याप्रमाणावर उपद्रव निर्माण केला असून ते लुट,खुन करत आहेत .याशिवाय स्थानिक जनतेवर मोठ्याप्रमाणावर अत्याचार केला असून महिलांनाही यातून सोडले नाही.लिबियाचा कधीच पाडाव होऊ शकत नाही.आमच्या पासून बंडाळींनी मिळविलेले सत्ता आणि भूप्रदेश आम्ही लवकरच काबीज करू असा विश्वास अब्राहिम यांनी व्यक्त केला.
