नायजेरियात जातीय दंगलीत २१ ठार

अबुजा दि. ६ सप्टेंबर- नायजेरियात जोस या शहरात उसळलेल्या जातीय दंगलीत अद्यापपर्यंत २१ जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांच्या दोन गटातील या संघर्षात ८२ जण  जखमी झाले आहेत.
जोस शहराच्या तोंडावर असलेल्या कुरू आणि मारबाना शहरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला.यामध्ये मोठ्याप्रमाणावर मनुष्यहानी झाली आहे.हल्लेखोरांनी त्यानंतर आपला मोर्चा शेजारील झाकूल गावाकडे वळवला .तेथे त्यांनी  गावकर्‍यांच्या झोपड्यांना आग लावल्या .यामध्ये झोपेत असलेल्या चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला.गेल्या काही वर्षापासून ख्रिश्चन समुदायाच्या नेत्याकडून मुस्लिम लोकांना नागरिकात्वाचा अधिकार देण्यास टाळाटाळ करत आहे.यामुळे दोन्ही गटात वारंवार हिसांच्या घटना घडत आहे.