
नागपूर दि.०६ सप्टेंबर- राज्यात सध्या युवक काँग्रेसच्या कार्यकरणीच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजीत तांबे यांच्यात अध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. सत्यजीत हे विलासराव देशमुख गटाचे उमेदवार आहेत, तर निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात विश्वजीत कदम यांच्या पाठीमागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांची फौज उभी केली आहे.
