महाराष्ट्रातपाच वर्षात १०० कोटी झाडे लावण्यात येणार,वनक्षेत्रात केवळ ३ कोटी झाडे शिल्लक

मुंबई – महाराष्ट्रातील हिरवळ दिवसेंदिवस कमी होत चालल्याने महाराष्ट्र सरकार चितेत पडले आहे.त्यामुळे राज्याच्या वन खात्याने आगामी पाच वर्षात १०० कोटी झाडे लावण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. यंदाच्या वर्षी या योजनेतंर्गत साडे अकरा कोटी झाडे लावण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात आता केवळ ३ कोटी झाडे शिल्लक असून वनक्षेत्राचा हिरवा पत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्याच्या ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर जमिनीपैकी केवळ ९ हजार ४६६ चौरस कि. मी. क्षेत्र हे वनराईचे आहे.
इंडिया फॉरेस्ट रिपोर्टप्रमाणे ६० हजार चौ. कि. मी. वनक्षेत्रात केवळ १६ टक्के इतकीच झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी याबाबत अलिकडेच एक तातडीची बैठक बोलाविली होती. त्यानंतर वनखात्यामार्फत एका महत्वाकांक्षी योजनेची आखणी करण्यात आली. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य सचिवांनी अनेक फेरफार सुचविले आहेत. राज्यातील आदिवासी जमातीला सोबत सोबत घेऊन संयुक्त वन समित्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाबरोबरच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांना प्रोत्साहनही देण्यात येणार आहे. राज्याचा वार्षिक आराखडा आणि योजनेतर आराखड्यातून अर्थसंकल्पातून तसेच रोजगार हमी योजना आदी योजनांतून सदर प्रकल्पावर ३८० कोटी रु. इतका खर्च करण्यात येणार आहे.