मोबाईल डिझाईन करा आणि मिळवा 50 हजार रुपये, भारतीय कंपनी देत आहे खास संधी

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. चीनी अ‍ॅप्स व स्मार्टफोन न वापरण्याचे आवाहन केले जात आहे. भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. मात्र आता बहिष्काराच्या मागणीमुळे या स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय कंपन्या देखील आता या संधीचा फायदा घेत बाजारात आपले स्थान निर्माण करत आहे. भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा भारतीय विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सला भारतीय स्मार्टफोन डिझाईन करण्याची संधी देत आहे.

लावाने या साठी डिझाईन इन इंडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात बी.टेक, बीई, बी. डेस. आणि एम.डेस सारखे इंजिनिअरिंग कोर्सचे विद्यार्थी आणि जाणकार भाग घेऊ शकतात. फोन बनविण्याची पुर्ण प्रक्रिया लावाच्या देखरेखेखाली पार पडेल.

लावाने या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. 2 जुलै पासून ते 9 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल. टॉप-2 विजेत्यांना प्री-प्लेसमेंट मुलाखतीची संधी तर मिळेलच, सोबतच 50 हजार रुपये, 25 हजार रुपये आणि 15 हजार रुपये रोख बक्षीस देखील मिळेल.

लावा आंतरराष्ट्रीयचे प्रमुख उत्पादक अधिकारी संजीव अग्रवाल म्हणाले की, मागील काही वर्षांपासून ही स्पर्धा आमच्या ब्रँडची ताकद राहिलेली आहे. याद्वारे ग्राहकांना काय हवे आहे, नवीन आयडिया या संदर्भात माहिती मिळते.

Leave a Comment