
मुंबई दि.२३ ऑगस्ट- शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक चांगलीच वाढली असून प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा अनेकांनी ‘ई – गोल्ड’ची खरेदी केली आहे. पहिल्या चार महिन्यांत ‘ई – गोल्ड’ची उलाढाल उच्चांकावर गेली आहे. ‘ई – गोल्ड’ची पहिल्या चार महिनाभरातील सरासरी उलाढाल ३०८२ कोटी ६० लाख रूपयांवर पोहोचली आहे. गतवर्षी याच कालावधीत ही उलाढाल ४३६ कोटी ८९ लाख रूपये होती, असे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालिका व सीईओ अंजली सिन्हा यांनी सांगितले.
या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांतील ‘ई – गोल्ड’ची उलाढाल ६० टक्के वाढली असून ऑगस्टपर्यंत ३८१३ कोटी ६३ लाख रूपयांची खरेदी- विक्री झाली. ‘ई – गोल्ड’ हा इलेक्ट्रोनिक स्वरूपात सोने खरेदी – विक्रीचा पर्याय आहे. राष्ट*ीय शेअर बाजाराने मार्च २०१० मध्ये अशा प्रकारच्या व्यवहाराला सुरूवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ‘ई – गोल्ड’ ने सुमारे ५७ टक्के परतावा दिला आहे.
